Wednesday, October 23, 2013

सुवर्णदुर्ग एक किल्ला Suvarndurg Fort

सुवर्णदुर्ग एक किल्ला - Suvarndurg Fort 

सुवर्णदुर्ग हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. 

इ.स.१६६० मध्ये महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याची डागडुजी केली.दर्याराजे कान्होजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाच्या बळावर सागरावर आपले वर्चस्व गाजविले.सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग हर्णेच्या बंदराजवळ वसलेला आहे. किल्ल्याच्या महाद्वाराजवळ पायरीवर कासवाचं शिल्प आहे, तर उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मुर्ती कोरलेली आहे.प्रवेशद्वाराच्या आत पहारेकराच्या दोन देवड्या आहेत.सुवर्णदुर्गाच्या आत विहिरी तसेच पडझड झालेले वाड्याचे अवशेष आहेत. गडावरची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत उभी आहे.गडावर एकून सात विहिरी आहेत.सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या किनार्‍यावर आणखी तीन सागरी दुर्गांची उभारणी करण्यात आलेली आहे,ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग,फत्तेदुर्ग आणि गोवागड.सुवर्ण दुर्गाच्या किनाऱ्यावर या दुर्गाचे दर्शन होते.एका तासात किल्ला पाहून होतो.
 

सुवर्णदुर्ग - Suvarndurg

 
कसे जाल?

मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या खेड फाट्यावरून दापोली आणि पुढे दापोलीहून बसने हर्णेला जाण्यासाठी बससेवा आहे. हर्णे बस स्थानकावरून साधारण १०-१५ मिनिटांत पायी हर्णे बंदर गाठता येते.
बंदरावरून किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पडाव ठेवले आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटे लागतात. ऐन सागराच्या कुशीत वसलेल्या या जलदुर्गावर आज पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने सोबत पाणी घेऊन जावे.

पाहण्यासारखे

दुर्गाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे. हे प्रशस्त प्रवेशद्वार शिवाजीने बांधून घेतले आहे असे म्हणतात. महाद्वाराजवळ पोहोचताच पायरीवर कासवाची प्रतिमा कोरलेली आहे. उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती त्या मानाने अर्वाचीन असावी. प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकऱ्यांच्या दोन देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. डाव्या हाताने पुढे गेल्यावर बांधीव विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथरे आहेत. किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक कोठार आहे. सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून शेवाळ्याने हिरवे पडलेले पाणी असलेल्या विहिरी आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष दिसतात. दुर्गाच्या पश्चिम तटाकडे एक सुरेख चोरदरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो. गडावर सात विहिरी आहेत, पण कुठेही मंदिर नाही. प्रसिद्ध दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी हिचे इथले देऊळ कान्होजीने केव्हातरी सुवर्णदुर्गावरून हलवून देवीची स्थापना अलिबागच्या हिराकोटामध्ये केली होती. इ.स. १६६० मध्ये शिवाजीने हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार दोन रुपये खर्च केले असा ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आहे.


Friday, October 18, 2013

आंबोली गाव सिंधुदुर्ग - Amboli Ghat Sindhudurg

सिंधुदुर्गातील आंबोली गाव समुद्र सपाटीपासून 690 मीटर उंचीवर असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. तत्कालीन सावंतवाडी संस्थानाची ही उन्हाळ्यातील राजधानी. या आंबोलीमध्ये अजुनही आपणास संस्थानकालीन भव्य इमारती पहावयास मिळतात. महात्मा गांधी काही काळ या ठिकाणी वास्तव्य करुन शिरोडा येथील मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी याच आंबोली घाटातून मार्गस्त झाले होते, असा इतिहास आहे.










Wednesday, October 16, 2013

हर्णे बंदर-सुवर्णदुर्ग (जि. रत्नागिरी) - Harne Bander Suvarndurg

हर्णे बंदर-सुवर्णदुर्ग (जि. रत्नागिरी)

 

काय पाहायचे हर्णेला


हर्णे येथे सुंदर समुद्रकिनारा असून जवळच सुवर्णदुर्ग किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला जहाज बांधणी साठी उपयोगात आला. एकनाथ महाराज पादुका मंदिर प्रसिद्ध आहे. पाज हे मच्छिमारी केंद्र. येथे जायला होडी आवश्यक पण मिळत नाही. किनाऱ्यावर फतेह दुर्ग, कनक दुर्ग व गोवा किल्ला (हवाई दुर्ग) आहे. प्रवेशद्वाराशी गंडभेरूडांचे दुर्मिळ शिल्प.

उत्तरेला तरीने जोग नदी ओलांडून आंजर्ले. कड्यावर २५० पायऱ्या चढून कड्यावरचा गणपती मंदिर पहावे. सभामण्डपात सुंदर कारंजे. माथ्यावरून गाव व किनारा सुंदर दिसतो. 

 
आड्याची खाडी ओलांडून केळशी गावात गणेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर व पांढरी शुभ्र पुळण असलेला किनारा. केळशी मंडणगड एस.टी. आहे.

केळशीच्या उत्तरेस वेळास येथे प्रेक्षणीय रामेश्वर मंदिर, सुरेख पुळण आणि नाना फडणवीस यांचे स्मारक आहे. उत्तरेस हिम्मतगड दुर्ग. येथे गणेश मंदिर आहे. माथ्यावरून हरेश्वर डोंगर दिसतो. एस.टी. ने बाणकोट मार्गे मंडणगडला जाता येते.


Harne Beach - Suvarndurg Fort

Friday, October 11, 2013

Thiba Palace - Ratnagiri Tourist Spot - थिबा पॅलेस

थिबा पॅलेस हे रत्नागिरीतले मोठे आकर्षण आहे. ९७ वर्षापूर्वीच्या या राजवाड्याचे धागे ब्रम्हदेशाशी जोडलेले आहेत. १८५५ च्या सुमारास ब्रम्ह देशाचा राजा थिबा - ज्याने तेथे ७ वर्ष राज्य केले- याचा पराभव करून ब्रिटिशांनी ब्रम्हदेश आपल्या ताब्यात घेतला आणि थिबा राजाला कैद केले. याचा त्याच्या प्रजेशी काही संबंध राहू नये यासाठी ब्रिटिशांनी त्याला रत्नागिरीत बंदिवान म्हणून ठेवले. २७ एकर आणि साडेअकरा गुंठे विस्ताराच्या मोठ्या भूखंडावर एक लाख सदतीस हजार चारशे शहाऐंशी रुपये खर्च करून तीन मजली राजवाडा उभारला गेला आणि १३ नोव्हेंबर, १९१० रोजी थिबा राजा आपल्या परिवारासह येथे राहण्यास गेला.

Thiba Palace Rantagiri

Thiba Palace - Ratnagiri Tourist Spot

The Thiba Palace was built in 1910-11 for the exile of the king and the queen of Burma. The place has tombs of the royal couple. This palace and Ratnagiri have been featured in Amitav Ghosh's novel, 'The Glass Palace.


For more information on E - Konkan please visit: https://www.facebook.com/ekkonkani