हर्णे बंदर-सुवर्णदुर्ग (जि. रत्नागिरी)
काय पाहायचे हर्णेला
हर्णे येथे सुंदर समुद्रकिनारा असून जवळच सुवर्णदुर्ग किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला जहाज बांधणी साठी उपयोगात आला. एकनाथ महाराज पादुका मंदिर प्रसिद्ध आहे. पाज हे मच्छिमारी केंद्र. येथे जायला होडी आवश्यक पण मिळत नाही. किनाऱ्यावर फतेह दुर्ग, कनक दुर्ग व गोवा किल्ला (हवाई दुर्ग) आहे. प्रवेशद्वाराशी गंडभेरूडांचे दुर्मिळ शिल्प.
उत्तरेला तरीने जोग नदी ओलांडून आंजर्ले. कड्यावर २५० पायऱ्या चढून कड्यावरचा गणपती मंदिर पहावे. सभामण्डपात सुंदर कारंजे. माथ्यावरून गाव व किनारा सुंदर दिसतो.
आड्याची खाडी ओलांडून केळशी गावात गणेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर व पांढरी शुभ्र पुळण असलेला किनारा. केळशी मंडणगड एस.टी. आहे.
केळशीच्या उत्तरेस वेळास येथे प्रेक्षणीय रामेश्वर मंदिर, सुरेख पुळण आणि नाना फडणवीस यांचे स्मारक आहे. उत्तरेस हिम्मतगड दुर्ग. येथे गणेश मंदिर आहे. माथ्यावरून हरेश्वर डोंगर दिसतो. एस.टी. ने बाणकोट मार्गे मंडणगडला जाता येते.

No comments:
Post a Comment