सुवर्णदुर्ग एक किल्ला - Suvarndurg Fort
सुवर्णदुर्ग
हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हर्णे बंदर प्राचीन काळापासून
प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक
महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी
हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली
आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
इ.स.१६६० मध्ये महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याची डागडुजी केली.दर्याराजे कान्होजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाच्या बळावर सागरावर आपले वर्चस्व गाजविले.सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग हर्णेच्या बंदराजवळ वसलेला आहे. किल्ल्याच्या महाद्वाराजवळ पायरीवर कासवाचं शिल्प आहे, तर उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मुर्ती कोरलेली आहे.प्रवेशद्वाराच्या आत पहारेकराच्या दोन देवड्या आहेत.सुवर्णदुर्गाच्या आत विहिरी तसेच पडझड झालेले वाड्याचे अवशेष आहेत. गडावरची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत उभी आहे.गडावर एकून सात विहिरी आहेत.सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या किनार्यावर आणखी तीन सागरी दुर्गांची उभारणी करण्यात आलेली आहे,ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग,फत्तेदुर्ग आणि गोवागड.सुवर्ण दुर्गाच्या किनाऱ्यावर या दुर्गाचे दर्शन होते.एका तासात किल्ला पाहून होतो.
कसे जाल?
मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या खेड फाट्यावरून दापोली आणि पुढे दापोलीहून बसने हर्णेला जाण्यासाठी बससेवा आहे. हर्णे बस स्थानकावरून साधारण १०-१५ मिनिटांत पायी हर्णे बंदर गाठता येते.
बंदरावरून किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पडाव ठेवले आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटे लागतात. ऐन सागराच्या कुशीत वसलेल्या या जलदुर्गावर आज पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने सोबत पाणी घेऊन जावे.
पाहण्यासारखे
दुर्गाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे. हे प्रशस्त प्रवेशद्वार शिवाजीने बांधून घेतले आहे असे म्हणतात. महाद्वाराजवळ पोहोचताच पायरीवर कासवाची प्रतिमा कोरलेली आहे. उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती त्या मानाने अर्वाचीन असावी. प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकऱ्यांच्या दोन देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. डाव्या हाताने पुढे गेल्यावर बांधीव विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथरे आहेत. किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक कोठार आहे. सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून शेवाळ्याने हिरवे पडलेले पाणी असलेल्या विहिरी आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष दिसतात. दुर्गाच्या पश्चिम तटाकडे एक सुरेख चोरदरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो. गडावर सात विहिरी आहेत, पण कुठेही मंदिर नाही. प्रसिद्ध दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी हिचे इथले देऊळ कान्होजीने केव्हातरी सुवर्णदुर्गावरून हलवून देवीची स्थापना अलिबागच्या हिराकोटामध्ये केली होती. इ.स. १६६० मध्ये शिवाजीने हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार दोन रुपये खर्च केले असा ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आहे.
Join Vivek More on Google+

No comments:
Post a Comment